breaking-newsआंतरराष्टीय

सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

बगदाद | महाईन्यूज

अमेरिकेने इराणच्या लष्कर प्रमुख पदाचा अधिकारी कासिम सुलेमानीला बगदाद विमानतळावर हवाई हल्ला करून ठार केलेले आहे. यामुळे इराण संतप्त झाला असून जग युद्धाच्या खाईत लोटले जाईल, अशी धमकी देण्यात आलेली आहे. अमेरिकेने केलेला हा हल्ला भ्याड असून दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया इराणकडून आलेली आहे. तर अमेरिकेतही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत.

अमेरिका- इराणदरम्यान तणावाचे वातावरण गेल्या दोन वर्षांपासून आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बगदादच्या अमेरिकन दुतावासावर इराणच्या पुरस्कृत संघटनेने हल्ला चढविला होता. याचा बदला म्हणून अमेरिकेने गेल्या चार दशकांपासून हवा असलेल्या सुलेमानीचा खात्मा केला आहे. यामुळे पश्चिम आशियातील वातावरण संतप्त झाले असून इंधनाच्या किंमतीही वाढलेल्या आहेत.

सुलेमानीच्या मृत्यूच्या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किंमतींमध्ये 1.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक बॅरलची किंमत 67.12 डॉलरवर पोहोचली आहे. तर अमेरिकन क्रूडच्या किंमतीतही 1.24 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेने या कारवाईचे स्वागत करताना सुलेमानी इराकमधील अमेरिकी अधिकाऱ्यांवर आणि सैनिकांवर हल्ला करण्याचे कट रचत होता. यामुळे त्याला अमेरिकेच्या लष्कराने आत्मसंरक्षणासाठी केलेल्या कारवाईत ठार केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात इराकच्या एका संघटनेचा म्होरक्या अबू महदी अल मुहादिन याच्यालसह अन्य पाच जण ठार झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button