breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

105 बालकांचा मृत्यू झालेल्या हॉस्पिटलची पाहाणी करायला गेलेल्या आरोग्य मंत्र्यांसाठी अंथरले गालिचे…

कोटा|महाईन्यूज |

राजस्थानमधल्या कोटा येथील जे. के. लोन या हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांत 13 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीही 23-24 डिसेंबर या दोन दिवसांत येथे दहा बालकं दगावली होती. महिन्याभरात आतापर्यंत 105 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

105 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर राजस्थान सरकारला जाग आली . राजस्थानचे आरोग्य मंत्री रघू शर्मा जे. के. लोन रुग्णालयात पोहोचून घटनेची माहिती घेणार होते. परंतु मंत्री पोहोचण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयात प्रवेशद्वारापासून वॉर्डपर्यंत कारपेट म्हणजेच गालिचाअंथरला होता. माध्यमांनी त्याचे चित्रीकरण सुरु केल्यानंतर गडबडीत गालिचा हटवण्यात आला.

रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, मंत्र्यांसाठी गालिचे अंथरुन आणि तात्पुरतं काम करुन रुग्णालय प्रशासन मंत्र्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहे. आरोग्य मंत्र्यांना सर्व परिस्थिती ठिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आरोग्य मंत्री रघू शर्मा यांची फसवणूक करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे… रुग्णालयाचे रंगरुप पालटण्याचा प्रयत्न सुरु केला. रुग्णालयातील सर्व वॉर्डची सफाई सुरु केली. सर्व बेडवर नव्या चादरी अंथरल्या. विशेष म्हणजे एरवी स्वतःच्या मर्जीनुसार कधीही रुग्णालयात येणारे डॉक्टर सकाळी 8 च्या आधीच रुग्णालयात दाखल झाले होते.

दरम्यान, प्रसुतीनंतर महिलांना ज्या वॉर्डमध्ये ठेवले जाते, तिथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा दिवा नव्हता. परंतु आज सकाळीच त्या वॉर्डमध्ये दिवा बसवण्यात आला. सकाळी-सकाळी सर्व खिडक्यांना जाळ्या आणि पडदे लावण्यात आले.यावरून फक्त आरोग्य मंत्र्यांना दाखवण्यासाठी रुग्नालयाच्या असुविधांचे चित्र सुविधांमध्ये क्षणांत बदलवून टाकलं…आणि वर्षानुवर्षे तिथे उपचारासाठी येणा-या रुग्णांना मात्र या सुविधांव्यतिरिक्त उपचार करून घ्यावे लागलेत..त्यांच्यावर हा अन्याय नाही का? हा मोठा प्रश्न निर्माण होतोय…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button