breaking-newsआंतरराष्टीय

सुलेमानींना मारणाऱ्या अमेरिकन सैन्यालाच इराणने घोषित केले दहशतवादी

तेहरान | महाईन्यूज

इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने शुक्रवारी हत्या केली आहे. सुलेमानींच्या हत्येमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढलेला आहे. सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा इराणने केली असून, सुलेमानींच्या हत्येस जबाबदार असलेल्या अमेरिकेच्या सैन्यदलालाच इराणने दहशतवादी घोषित केले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी कासिम सुलेमानी हे इराकमधील बगदाद विमानतळावर आले असतानाच अमेरिकेने तेथे क्षेपणास्त्र हल्ला केलेला होता. या हल्ल्यात कासिम सुलेमानी यांच्यासह काही लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. सुलेमानींचा मृतदेह त्यांच्या अंगठीवरून ओळखण्यात आला आहे. सुलेमानी हे इस्लामिक रिव्होल्यूशनरी सेनेच्या एका ताकदवान विंग ‘कदस फोर्स’चे ते प्रमुख होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button