breaking-newsआंतरराष्टीय

‘या’ देशातील लोकांना आता फक्त 6 तास करावे लागणार काम, आठवड्यातून तीन दिवस मिळणार सुट्टी

फिनलंडच्या नव्या पंतप्रधान सना मरीन यांनी एक विधेयक सादर केले आहे. या विधेयकानुसार, आता देशातील सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बाब म्हणजे आठवड्यातून फक्त 4 दिवस, सहा तासांसाठी काम करावे लागणार आहे. तसेच, या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. या निर्णयामुळे देशातील कर्मचारी वर्ग हा आपल्या कुटुंबीयांसोबत जास्त काळ राहू शकेल, असे पंतप्रधान सना मरीन यांचे मत आहे.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, “लोकांना आपले कुटुंब, चाहते आणि आपल्या मनपसंतीचे काम करण्यासाठी अधिक वेळ मिळाला पाहिजे व हे आपल्या कार्यकाळातील पुढील पाऊल असू शकते.” असे सना मरिन यांनी सांगितले आहे. तसेच, सना मरीन यांनी सादर केलेल्या प्रस्तावाचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या कौशल्य क्षमतेत सुधार करण्याचा आहे. संसदेत सना मरीन यांनी हा प्रस्ताव सादर केल्यानंतर डाव्या आघाडीचे नेते आणि शिक्षणमंत्री ली एंडरसन यांनी या प्रस्तावाचे कौतुक केले आहे. फिनलंडमधील लोकांना कमी काम करण्याची परवानगी द्यावी. कारण, यामुळे लोकांची मदत होईल आणि मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण होईल, असेही सना मरीन यांनी यावेळी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button