breaking-newsराष्ट्रिय

पकोडयाच्या वादातून सासूची हत्या करणाऱ्या जावयाला अटक

पकोडे तळण्यावरुन झालेल्या वादातून सासूची हत्या करणाऱ्या जावयाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी आफ्रोझ (२४) मागच्या काही महिन्यांपासून फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी १० किलोमीटपर्यंत त्याचा पाठलाग करुन उत्तर प्रदेश गाझीपूरच्या शेतामधून त्याला अटक केली. आफ्रोझचे मागच्या वर्षी शाईस्ता नावाच्या तरुणीबरोबर लग्न झाले. त्यांनी दिल्लीच्या रामपूरा भागात भाडयावर घर घेतले.

लग्नानंतर काही महिन्यांनी शाईस्ताची आई फौझिदा त्यांच्याकडे रहायला आली. त्यावरुन शाईस्ता आणि आफ्रोझमध्ये सतत भांडणे व्हायची असे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या दिवशी शाईस्ताने घरातल्या सदस्यांसाठी पकोडे बनवले होते. त्यातले काही पकोडे तिने आफ्रोझसाठी ठेवले. संध्याकाळी आफ्रोझ कामावरुन घरी आल्यानंतर शाईस्ताने त्याला खाण्यासाठी पकोडे दिले. आपल्याला थंड पकोडे दिले त्यावरुन आफ्रोझने शाईस्ताबरोबर वाद घातला

फौझिदाने त्यांच्या वादात हस्तक्षेप केल्यानंतर भडकलेल्या आफ्रोझने चाकू उचलला व फौझिदावर वार केले. शाईस्ताने त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिला सुद्धा भोसकले व तिथून पळ काढला. आफ्रोझला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक टीम बनवली. आफ्रोझ दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबई अशी सतत आपली ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला गाझीपूरमधून अटक केली. तिथे तो मजूर म्हणून काम करत होता. पोलीस आफ्रोझपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. पण त्याने शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी १० किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन त्याला पकडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button