breaking-newsराष्ट्रिय

सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भर होणारच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जागतिक शांती आणि अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास आम्ही कटिबध्द आहोत याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. ‘सुरक्षा क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये आत्मनिर्भर हिंदुस्थान’ या विषयावर आयोजित ऑनलाईन वेबिनारमध्ये ते बोलत होते. आगामी काळात स्वदेशी खरेदीवर अधिक भर दिला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची आमची कटिबध्दता फक्त कागदापुरती किंवा चर्चेपुरती मर्यादित नाही असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘सुरक्षा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक वर्षांपासून आम्ही प्रयत्न कपरत आहोत. सुरक्षेसाठी लागणारे तंत्रज्ञान हिंदुस्थानातच विकसित व्हावे, इथेच सुरक्षा उत्पादनांची निर्मिती व्हावी आणि खासगी क्षेत्राचाही सुरक्षेमध्ये विस्तार व्हावा असे आमचे लक्ष्य आहे. ते साध्य करण्यासाठी आम्ही पावलेही उचलली आहेत.’ असे यावेळी मोदी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button