breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

संजय राऊत यांची अँजिओग्राफी, लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार

मुंबई:- शिवसेना खासदार संजय राऊत यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. संजय राऊत यांची रात्री 8 वाजता अँजिओग्राफी करण्यात येईल, अशी माहिती आहे. विख्यात हृ्दयरोगतज्ज्ञ डॉ. सॅम्युअल मॅथ्यू हे त्यांच्यावर उपचार करतायत.संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे सत्तास्थापनेच्या चर्चेची जबाबदारी अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्यावर देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत सतत सत्तास्थापनेच्या चर्चेत व्यग्र होते. या सगळ्या धावपळीचा त्यांच्यावर ताण आला असावा. संजय राऊत यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास होत होता. जास्त त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे लीलावतीमध्ये जाणार अशीही चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button