breaking-newsताज्या घडामोडी

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,17,658 वर

  • मुंबईत 1,609, पुण्यात 1,020 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. बुधवारी आढळलेल्या 8 हजार 142 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 16 लाख 17 हजार 658 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 180 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 42 हजार 633 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 23 हजार 371 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 14 लाख 15 हजार 679 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 58 हजार 852 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 1 हजार 609 नवे रुग्ण आढळले, तर 48 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 45 हजार 869 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 912 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 894 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मुंबईत आतापर्यंत 2 लाख 15 हजार 269 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 19 हजार 245 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 1 हजार 020 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 35 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 16 हजार 776 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 559 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 1 हजार 020 रुग्णांपैकी 428 रुग्ण हे पुणे शहरातील असून 244 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे आता पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 58 हजार 387 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 86 हजार 114 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button