breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

#SushantSinghSuicideCase: सुशांतचा केअर टेकर सीबीआयच्या रडारवर, माफीचा साक्षीदार करण्यासाठी प्रयत्न?

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत जवळपास 7 जणांची चौकशी केलेली आहे. मात्र, सुशांतचा केअर टेकर दीपेश सावंत सीबीआयसाठी फार महत्त्वाचा ठरणार असल्याचं दिसत आहे. दीपेश सीबीआय तपासाला योग्य दिशा देऊ शकतो आणि म्हणूनच त्याला माफीचा साक्षीदार बनवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुशांतच्या घरातील केअर टेकर दीपेश सीबीआयच्या तपासातला महत्वाचा व्यक्ती मानला जात आहे. आता तर दीपेश माफीचा साक्षीदार होणार असल्याची माहिती आहे. सध्या दीपेश सीबीआय थांबलेल्या DRDO गेस्ट हाऊसमध्येच आहे. त्याला बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

सुशांतच्याच फ्लॅटमध्ये राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंतनं बुधवारी सीबीआयला कथितपणे महत्वाची माहिती दिल्याचं बोललं जात आहे. यानुसार 8 जूनला रिया आणि सुशांतचं जोरदार भांडण झाल्याचं पिठाणी आणि दीपेशनं सांगितलेलं आहे. त्यानंतर रियानं 8 हार्ड ड्राईव्ह नष्ट केल्या आणि ती घरातून निघून गेली, असाही दावा त्यानी केलेला आहे.

सीबीआयच्या आधी दीपेशची मुंबई पोलिसांनी तीन वेळा आणि ईडीनं दोनदा चौकशी केलेली आहे. आता सीबीआय त्याची कसून चौकशी करत आहे. दीपेशची 21 ऑगस्टला 7 तास, 22 ऑगस्टला 10 तास, 23 ऑगस्टला 9 तास, 24 ऑगस्टला पुन्हा 9 तास, 25 ऑगस्टला 8 तास, आणि 26 ऑगस्टला पुन्हा 10 तास चौकशी झालेली आहे. गुरुवारीही (28 ऑगस्ट) दीपेशची कसून चौकशी झाली आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी दीपेशही फ्लॅटवरचा होता. त्यामुळं दीपेशला माफीचा साक्षीदार बनवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं बोललेलं जात आहे. असं झालं तर तो बारीक बारीक गोष्टी सांगण्याबरोरच 14 जूनला त्यांनं काय पाहिलं या संपूर्ण घटनेचा खुलासा करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button