breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सीरमच्या लसीबाबत विशेष तज्ज्ञ समितीची बैठक सुरू

नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली असून भारतात लसीकरण कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यापार्श्वभूमीवर सीरमच्या लसीकरणाला अर्जावर विशेष तज्ज्ञ समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत सीरमच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय होऊ शकतो.

वाचा :-आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा ३१ जानेवारीपर्यंत बदंच, केंद्र सरकारकचा निर्णय

ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेन्का लसीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्ना पाठोपाठ आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. तर, आता भारतातही ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता वाढली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या या लसीची सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्मिती आणि वितरण केले जाणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने यापूर्वीही लसीच्या आपातकालीन वापरासाठी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. याशिवाय, भारत बायोटेक आणि फायझरकडून आपापल्या लसीच्या आपातकालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, भारतीय औषध महानियंत्रकांकडून नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीकडून या तिन्ही कंपन्यांकडे लसीसंदर्भातील अधिक तपशील मागवण्यात आले होते. जेणेकरुन या लसींच्या परिणामकारकतेची नेमकी खात्री पटवता येईल. तज्ज्ञ समितीच्या या भूमिकेनंतर सीरम, भारत बायोटेक आणि फायझरने आणखी वेळ मागितला होता. त्यामुळे भारतातील कोरोना लसीकरण मोहीम लांबणीवर पडली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button