breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार अण्णा बनसोडे आणि विलास लांडे यांनी दिवाळीनिमित्त घेतली शरदचंद्रजी पवार यांची सदिच्छा भेट

पिंपरी – पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे आणि ज्येष्ठ नेते माजी विलास लांडे यांनी आज दीपावली निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांची बारामती येथील गोविंद बागेतील घरी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.यावेळी जीवन शेठ खराबी, सरपंच खराबवाडी, हनुमंत कड, माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटी दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील घडामोडी आणि वस्तुस्थितीचा आढावा पवार साहेबांनी घेतला. महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन आणि पक्षाचा विचार घराघरापर्यंत पोचून सत्ता खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी कामाला लागा, आवश्यक ती सर्व मदत आणि ताकद दिली जाईल. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे हित आणि कल्याण हे ध्येय ठेऊन सत्तांतरा नंतर पुढील पाच वर्षाचे सर्वांगीण विकासाचे धोरण आणि त्याप्रमाणे आखणी करून कामकाज सुरू करा, अशा सूचना पवार साहेबांनी आमदार आणि माजी आमदारांना दिल्या.

यावेळी झालेल्या चर्चेत शहरातील परिस्थितीचा पुढील आठवड्यात पुन्हा आढावा पवार साहेबांकडून घेण्यात येणार आहे. गेल्या ५ वर्षात शहराची पीछेहाट झालेली असून सामन्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. हे शहर कामगार नगरी असून या शहरातील मूळ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी औद्योगिकरणासाठी आणि शहराच्या विकासासाठी दिल्या आहे.

अजितदादांच्या कल्पनेतील हे शहर मागील ५ वर्षात कचरा, अस्वच्छता, भ्रष्टाचार अशा प्रकरणामुळे बदनाम झाले असून आता पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पाठबळ घेऊन सत्तांतर घडवून आणणार असल्याचा विश्वास आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.

दिवाळीनिमित्त शहरातील तमाम नागरिकांना शुभेच्छा आणि ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा पवार साहेबांनी दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button