breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

Sakshi Malik : ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकने कुस्ती सोडली!

Sakshi Malik : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याच सहकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. संजय सिंह यांची कुस्ती महासंघाचने नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. यानंतर ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठा निर्णय घेतला आहे. महिला पैलवान साक्षी मलिक आणि विनेश फोगटने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

साक्षी मलिक म्हणाली, आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो. देशभरातील अनेक भागातून लोक आम्हाला समर्थन करण्यासाठी आले. यात वृ्द्ध महिलांचाही समावेश होता. आमच्याकडे असेही लोकं आली ज्यांच्यांकडे खायला आणि कमवायला काहीच नाही. मी मनापासून अन्याविरुद्ध लढाई लढली, पण ब्रिजभूषण यांच्यासारख्या व्यक्तींच्या हाती डब्ल्यूएफआयचा कारभार राहिल्याने मी कुस्तीतून निवृत्ते होत आहे. आम्ही जिंकू शकलो नाही, मात्र सर्वांचे आभार.

हेही वाचा  –  गिरीश महाजनांनी मनोज जरांगेंची ‘ती’ मागणी फेटाळली; म्हणाले..

विनेश फोगट म्हणाली, संजय सिंह यांना आज कुस्ती महासंघाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यांना अध्यक्ष केले म्हणजे खेळातील मुलींना पुन्हा बळी पडावे लागेल. आम्ही जी लढाई लढत होतो त्यात यश आलं नाही. देशात आम्हाला न्याय कसा मिळेल हे माहीत नाही. आज कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे, हे अतिशय दुःखद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button