breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पहिल्याच पावसात ‘पूरनियंत्रण कक्ष’ ढेपाळला ; अनुउपस्थितीत कर्मचा-यांना नोटीस

पिंपरी – पावसाळ्यात आपत्कालिन परिस्थितीला सक्षमपणे तोंड देवून पुरसदृश्य परस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष’ आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले. त्यात 24 बाय 7 तत्वावर कर्मचा-याच्या नियुक्ती केल्या. मात्र, आज (गुरुवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. शहरातील अनेक नागरिकांनी अग्नीशामक विभागाकडे तब्बल 35 कॅाल करुन झाड उन्मळून पडल्याची, वेगवेगळ्या भागात पाणी घरात शिरल्याची आणि किरकोळ आगीची घटना घडल्याची माहिती दिली. याबाबत पूरनियंक्षण कक्षाकडे कसलीही माहिती उपलब्ध नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे पहिल्याच पावसात महापालिकेने स्थापन केलेला पूरनियंत्रण कक्ष ढेपाळल्याचे दिसून आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्नीशामक विभागाने पूरनियंत्रण आराखडा 2018 तयार केला. याकरिता संबंधित विभागातील अधिका-यांची आढावा बैठकही घेतली. त्यानूसार आठही क्षेत्रीय कार्यालयात पुरनियंत्रण कक्ष आणि महापालिकेत मुख्य मध्यवर्ती केंद्र करण्यात आले. त्या केंद्रावर चोवीस तास अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहर व परिसरात गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ढगांच्या गडगटांसह मुसळधार पाऊस झाला. सुमारे एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झाले. चाकरमानीसह वाहनचालकांची चांगलीच पंचाईत झाली. शहरातील संत तुकारामनगरात एक झाड उन्मळून पडले. तर वाकडच्या श्रीराम कॅालनीतील घरामध्ये पाणी शिरले. पिंपरी कॅम्पातील वैभवनगर, किर्ती हॅास्पीटल, सुष्मा अर्पामेंट, दत्तमंदीर परिसात पाणी साचून राहिले. केएसबी चैाकातील दुकाना पाणी घूसून मालाचे नूकसान झाले. काळेवाडी, जोतिबानगर, रहाटणी, विजयनगर आदी भागातील बैठ्या घरात पाणी शिरल्याचे घटना घडल्या आहेत. तसेच पिंपळे सैादागरच्या शुभश्री सोसायटी मधील रोहाऊसमध्ये पाणी साचले, तर दिपमाला सोसायटीतही पाणी साचून राहिले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्ष व प्रभागातील पुरनियंत्रण कक्षातील कर्मचा-यांनी विविध घटनांची कल्पना नव्हती. त्यामुळे पहिल्याच पावसात आपत्कालिन परस्थितीला तोंड देण्यास कक्षातील नियुक्त कर्मचारी सज्ज नसल्याचे दिसून आले.

 

 

मध्यवर्तीसह प्रभागस्तरावरील पूरनियंत्रण कक्षात नेमणूक केलेल्या जागी संबंधित अधिकारी व कर्मचारी हजर नसतील, यांची चाैकशी करण्यात येईल. पूरनियंत्रण कक्षाने प्रसिध्द केलेल्या  त्या-त्या नंबरचे कॅाल घेतले नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यास संबंधिताना नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल.
डॅा. प्रवीण आष्टीकर – अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button