breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सिलेंडरच्या स्फोटात लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू

दिल्ली | महाईन्यूज

दिल्लीतील किरारी भागात तीन मजली निवासी व व्यावसायिक इमारतीस आग लागून सोमवारी तीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेबारा वाजता एका घरात आग लागल्याची खबर मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाच्या आठ गाडय़ा घटनास्थळी पाठवण्यात आलेल्या होत्या. इमारतीच्या तळ मजल्यावर कपडय़ांचे गोदाम होते व इतर तीन मजल्यांवर लोक राहत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ वाजून ५० मिनिटांनी ही आग आटोक्यात आलेली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, किरारी येथील घटनेत तीनजणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यात पूजा आणि त्यांच्या मुली आराध्या व सौम्या यांचा समावेश आहे. इमारतीचे मालक रामचंद्र झा (वय ६५), सुंदरिया देवी (वय ५८), संजू झा (वय ३६), गुड्डन आणि उदय चौधरी व त्यांची पत्नी मुस्कान तसेच त्यांची मुले अंजली (वय १०) व आदर्श (वय ७) तसेच तुलसी (वय सहा महिने) यांचा मृत्यू झाला. इमारतीत आग विझवण्याची यंत्रणा बसवलेली नव्हती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट होऊन इमारतीचा एक भाग कोसळला. आगीच्या कारणांची चौकशी केली जात आहे. शॉर्टसर्किटमुळे सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची शंका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button