breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांचे कल्याण, सातवा वेतन आयोग लागू – आमदार आण्णा बनसोडे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू कगरण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. नगरविकास विभागाकडून आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. या निर्णयानुसार पालिकेतील 8 हजार 300 अधिकारी आणि कर्मचा-यांचे कल्याण होणार आहे, अशी माहिती पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांनी सोमवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बनसोडे यांनी ही माहिती सांगितली. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, मंगला कदम, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा तथा नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका माई काटे, प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.

आमदार बनसोडे म्हणाले, सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेलाच या निर्णयाचा प्रथम फायदा होत आहे. या निर्णयामुळे कर्मचा-यांच्या वेतनात सुमारे सात ते आठ हजार रुपयांनी वाढ होईल. यासाठी पालिकेला सुमारे 93 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सरकारने सत्तेत येताच केवळ दोन महिन्यात कर्मचा-यांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी 11 जून 2019 रोजी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला. त्यावर तत्कालीन राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नव्हती. महाआघाडीचे सरकार आल्यानंतर 11 डिसेंबर रोजी एका शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. केवळ आठ दिवसात हा निर्णय घेण्यात आला. 21 डिसेंबर रोजी यावर शिक्कामोर्तब करण्यात आले, असेही आमदार बनसोडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button