breaking-newsराष्ट्रिय

‘सिमी’च्या अठरा सदस्यांना तुरुंगवासाची शिक्षा

कोची : केरळमध्ये २००७ मध्ये शस्त्र प्रशिक्षण शिबिर चालवल्याच्या प्रकरणात सिमी या संघटनेच्या १८ सदस्यांना विशेष एनआयए न्यायालयाने सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी १८ जणांना दोषी ठरवण्यात आले होते.

न्यायाधीश कौसर एडप्पागथ यांनी दोषींना विविध आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून, त्यात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, स्फोटके प्रतिबंधक कायदा, गुन्हेगारी कट कलम १२० बी हे कायदे व कलमांचा समावेश आहे. कलम १० अन्वये एक वर्ष, कलम ३८ (यूएपीए) अन्वये पाच वर्षे, कलम ४ (ईएसए) व कलम १२० बी (भादंवि) अन्वये सात वर्षे या प्रमाणे शिक्षा सुनावण्यात आल्या असून, त्या एकाच वेळी भोगायच्या आहेत, त्यामुळे चौदा आरोपींनी आधीच सात वर्षे तुरुंगात काढलेली असल्याने त्यांची सुटका होणार आहे असे बचाव पक्षाने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button