breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांची दुपारी २ वाजता महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली – ‘भारत बंद’नंतर केंद्र सरकारने पाठवलेला कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावून लावला आहे. त्यानंतर आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्ववभूमीवर पुढील आंदोलनाची रणनिती ठरवण्यासाठी आज सिंधू बॉर्डरवर दुपारी 2 वाजता शेतकरी संघटनांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 40 शेतकरी संघटनांचे नेते सहभागी होणार असून 12 आणि 14 डिसेंबरला केल्या जाणाऱ्या आंदोलनाची रणनिती ठरवण्यात येणार आहेत. दरम्यान, सरकारसोबत आज होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे.

वाचा :-भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 97,67,372 वर

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आक्रोश व्यक्त होत आहे. आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा १५वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय पक्षांसह नामवंत खेळाडू, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button