breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांचे निधन

बेळगाव – ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांचे दुःखद निधन झाले आहे. निर्भिड आणि सडेतोड लेखन करून त्यांनी पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला होता. सीमा आंदोलनातदेखील त्यांचा मोठा सहभाग होता. ते ९२ वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, अशोक याळगी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

अशोक याळगी यांनी अनेक विषयांना आपल्या सदरातून वाचा फोडली होती. सीमाभागातील अनेक साहित्य संमेलनाचे ते मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. विविध क्षेत्रातील मंडळींशी त्यांचा घनिष्ट परिचय होता. वाङमय चर्चा मंडळ आणि लोकमान्य ग्रंथालयाच्या माध्यमातून ते सदैव कार्यरत होते. लोकमान्य वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून विविध उपक्रम त्यांनी राबवले होते. तसेच बेळगावच्या साहित्यिक क्षेत्रात ते नेहमी उत्साहाने आपला सहभाग नोंदवत असत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button