breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
सावली निवारा केंद्राला अधिकारी संभाजी ऐवले यांची भेट
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रियल लाइफ रियल पिपल संचलित सावली निवारा केंद्राला नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले आणि सहायक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी सदिच्छा भेट दिली.
निवारा केंद्रातील निवासी 25 व्यक्तींशी त्यांनी संवाद साधला. तसेच, नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. निवासी चारुदत्त पत्की यांच्या चित्रीकरणाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच, निवारा केंद्राचे संचालक एम. ए. हुसैन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यवस्थापक गौतम थोरात, मिलींद माळी, प्रकाश पाटील, अंकुश गायकवाड, उर्मिला कोरडे, सुनिता श्रीनाथ, सिध्दार्थ बांगड आदी उपस्थित. होते.