breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीच्या जिजामाता रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात करोना लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आला. यावेळी करोनाची लसीकरणाचे नियोजन कसे असेल याचे प्रात्याक्षिक घेण्यात आले. लसीकरणासाठी प्रत्यक्षात कक्ष उभारणी करण्यात आली होती. या कक्षाला आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी भेट देवून पाहणी केली.

करोना वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारने करोना लसीकरणाबाबतचे नियोजन केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार करोना लसीकरणाची ड्राय रन (रंगीत तालीम) आज देशभर आयोजित करण्यात आला होता. राज्य शासनाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयाची निवड करोना लसीकरणाची ड्राय रन साठी केली होती. त्यानुसार सर्व तयारी करुन आज करोना लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आला.

या ड्राय रन साठी 29 लाभार्थींना निवडण्यात आलेले होते. त्यामधील 28 लाभार्थ्यांवर लस देण्याच्या प्रात्यक्षिकाची रंगीत तालीम करण्यात आली. पण प्रत्यक्षात लस टोचण्यात आली नाही. एका लाभार्थ्यांने लसीकरणास नकार दर्शविला याचेही प्रत्यक्षिक या वेळी घेण्यात आले. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा या सोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार करण्यात आले आहेत.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, संचालक आरोग्य सेवा डॉ. अर्चना पाटील, अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप पाटील, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजय देशमुख, युनिसेफ सल्लागार डॉ. सतिष डोईफोडे, सर्वेलन्स मेडिकल ऑफिसर डब्ल्युएचओ डॉ. चेतन खाडे, रिजनल टिम लिडर डब्ल्युएचओ डॉ. राहुल शिंपी, लस व शितसाखळी व्यवस्थापक निरज गुप्ता, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, डॉ.बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर व पीएचएन शोभा ढोले हे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button