breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये आज 128 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज (शनिवारी) दिवसभरात 128 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरामध्ये आजपर्यंत 96851 जणांना करोनाची लागण झाली आहे.

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 123 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 5 जणांना करोनाची लागण झाली. तसेच आज दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 2 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील बालाजीनगर, आकुर्डी येधील 2 व शहराबाहेरील खेड व जुन्नर येथील 2 रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2492 इतक्‍या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1759 तर शहराबाहेरील 733 रुग्णांचा समावेश आहे.

आज दिवसभरात 84 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 93559 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1567 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप 866 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्य:स्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 647 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 886 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1533 इतकी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button