breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावधान..आरोग्य सेतू ॲपची निर्मिती कोणी केली? हेच मोदी सरकारला माहीत नाही!

मुंबई –

मोदी सरकार आणि आम्हाला माहिती नाही असे समीकरणच होत चालले आहे का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. कोरोना महामारीमध्ये ट्रेसिंग करण्यासाठी अगदी पीएम मोदींपासून ते अंगणवाडीतील आशा वर्कर्सपर्यंत आरोग्य सेतू ॲपचा वापर करा म्हणून सांगत होते. आता याच आरोग्य ॲपवरून मोदी सरकारने दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

माहितीच्या अधिकारातून या ॲपची निर्मिती कोणी केली? असे विचारण्यात आले असता आम्हाला माहिती नाही असे सनसनाटी उत्तर देण्यात आले. या उत्तरानंतर सोशल मीडियासह विरोधकांनी मोदी सरकारवर कडाडून प्रहार चढवला. आरोग्य सेतूवरून माहिती आयोगाशी झालेल्या वादानंतर मोदी सरकारकडून स्पष्टीकरण पुढे आले. सार्वजनिक तसेच खासगी सहकार्याने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आरोग्य सेतु अ‍ॅप विक्रमी वेळेत तयार करण्यात आल्याचे सरकारने सांगितले. हे अगदी पारदर्शक पद्धतीने विकसित केले गेले.

आरोग्य सेतु अॅप सुमारे २१ दिवसांच्या विक्रमी कालावधीत विकसित करण्यात आल्याचे सरकारने सांगितले. आरोग्य सेतू अ‍ॅपबाबत काही शंका नसावी आणि भारतात कोविड -१९ साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी हे मोलाचे काम करत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की केंद्रीय माहिती आयोगाने मंगळवारी राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) कडे जाब विचारला की आरोग्य सेतू ॲपचे आपल्या वेबसाइटवर नाव आहे, तर त्यांच्याकडे अ‍ॅपच्या विकासाविषयी तपशील का नाही? या संदर्भात आयोगाने राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि एनआयसी यांच्यासह अनेक मुख्य सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्या होत्या.

आरोग्य सेतू अ‍ॅपला कोरोना व्हायरस संपर्क ट्रेसिंगसाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले. आरोग्य सेतू अ‍ॅपच्या संकेतस्थळावर असे म्हटले आहे की ते राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केले आहे, परंतु या अ‍ॅपबद्दल एका माहिती अधिकारात दोघांनीही सांगितले की हे अ‍ॅप कोणी विकसित केले याविषयी त्यांच्याकडे माहिती नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button