breaking-newsमनोरंजन
साराने इब्राहिमसोबतचा मस्तीचा व्हिडिओ केला शेअर
मुंबई. सारा अली खानही बाकीच्या स्टार्सप्रमाणे आपल्या घरात लॉकडाऊन वेळ घालवत आहे. या दिवसांत ती भाऊ इब्राहिम अली खानसोबत क्वालिटी वेळ घालवत आहे. साराने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती इब्राहिमबरोबर नॉक नॉक गेम खेळताना दिसत आहे, तर साराच्या हजरजबाबीपुढे इब्राहिम गप्प बसला आहे. या व्हिडिओसोबत साराचे पुन्हा एकदा काव्यात्मक कौशल्यही दिसले आहे.
साराने तिच्या भावासोबत मस्तीचा व्हिडिओ पहिल्यांदाच शेअर केला असे नाही. हा दोघांचा आवडता खेळ आहे. याआधीही साराने याच नॉक नॉक राऊंडचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात सारा बहुतेक वेळा जिंकताना दिसली आहे.