breaking-newsआंतरराष्टीय
#coronovirus:कोरोनामुळे बालकांच्या पायाच्या बाेटांना सूज; फाेडही येऊ लागले! लहान मुलांमध्ये नवी लक्षणे…
लंडन. जगभरातील लहान मुलांमध्ये काेराेनाची लागण हाेण्याची नवीन लक्षणे आता समाेर येऊ लागली आहेत. डाॅक्टरांनी या लक्षणांना ‘कोविड टो’ असे नाव दिले आहे. या लक्षणांत लहान मुलांच्या पायांच्या बाेटांना सूज दिसते. नंतर तीन- चार दिवसांनी फाेडही येऊ लागतात.
इटलीतील बाधित मुलांमध्ये सर्वप्रथम ही लक्षणे दिसली. तीन दिवसांत ब्रिटनमध्येही अशा केसेस समाेर आल्या. अमेरिकेत डाॅक्टरांनाही एक डझन मुलांमध्ये अशी लक्षणे दिसली. भारतात मात्र अजून एकाही रुग्णात हे लक्षण नाही.