breaking-newsक्रिडा

गंभीरकडून घराच्या सदस्य मानत घरकाम करणाऱ्या महिलेवर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली. आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवणाऱ्या भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटू गाैतम गंभीरने सामाजिक जबाबदारी पार पाडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेवर त्याने अंत्यसंस्कार केले. गाैतम गंभीरकडे घरकाम करणाऱ्या ४९ वर्षीय सरस्वती पात्रा यांचे निधन झाले. त्यांना अनेक दिवसांपासून आजार हाेता. अशात त्यांनी मंगळवारी शेवटचा श्वास घेतला. माझ्या घरातील एक सदस्य म्हणून मी अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहे, असे ताे म्हणाला. यातून गाैतम गंभीरने स्वत:हून पुढाकार घेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.


‘अशा प्रकारच्या सामाजिक जबाबदारीमधूनच जातिभेद दूर हाेण्यास मदत हाेईल. यातून समाजात एकाेपा नांदण्यास मदत हाेईल, अशीही त्याने प्रतिक्रिया दिली. मागील सहा वर्षांपासून सरस्वती ह्या गाैतम गंभीरकडे घरकाम करत हाेत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button