breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune : सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकाविरोधात ईडीची कारवाई

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. पनामा पेपर प्रकरणात पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांची मुंबईतील सीजे हाऊसमधील ४१.६४ कोटी रुपये किमतीच्या ३ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

हेही वाचा – सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा

फेमा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने पनामा पेपर्स प्रकरणात संशयास्पद व्यवहार केल्याप्रकरणी झेड.एस. पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तपास केला. ईडीने फेमा कायद्यातील तरतुदींनुसार, पूनावाला यांची मुंबईच्या वरळी येथील सीजे हाऊसमधून ४१.६४ कोटी रूपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या प्रतरणाचा अधिक तपास ईडीकडून सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button