breaking-newsराष्ट्रिय

सामूहिक बलात्कार पीडित बिल्किस बानोला ५० लाखांची भरपाई द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

गुजरात दंगलींच्या काळात सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या बिल्किस बानो यांना दोन आठवड्यात ५० लाखांची भरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे. यासोबतच आदेशात घर आणि सरकारी नोकरी देण्यासही सांगण्यात आलं आहे. २००२ गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी एप्रिल महिन्यातही गुजरात सरकारला हाच आदेश दिला होता. मात्र त्यावेळी वेळेचं कोणतंही बंधन नव्हतं. पाच महिने उलटून गेल्यानंतरही गुजरात सरकारकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात न आल्याने सर्वोच्च न्यायालायने पुन्हा एकदा नव्याने आदेश दिला आहे. यानुसार गुजरात सरकारला दोन आठवड्यात बिल्किस बानो यांना ५० लाखांची भरपाई द्यावी लागणार आहे.

गुजरात दंगलीदरम्यान ३ मार्च २००२ रोजी दाहोद येथी राधिकापूर गावात जमावाने बिल्किस यांच्या कुटुंबावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांची आई, बहिण, लहान मुलगी आणि एका नातेवाईकाची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी गरोदर असणाऱ्या बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार झाला तेव्हा बिल्किस बानो १९ वर्षांच्या होत्या. अहमदाबादमध्ये याप्रकरणी सुनावणीही पार पडली होती.  बिल्किस आणि त्यांचे दोन नातेवाईक आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले होते. तेव्हापासून त्या न्याय मिळवण्यासाठी लढा देत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button