breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भाजपमध्ये आज पुन्हा महाभरती

मुंबई | महाईन्यूज | प्रतीनिधी

भाजपमध्ये सोमवारी पुन्हा महाभरती होणार असून काँग्रेसमधील काही आमदार व नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यसूत्री जाहीर करणार असून पुन्हा पदभार स्वीकारल्यावर त्या मुद्दय़ांवर सरकारचा भर राहणार आहे.

काँग्रेसचे काही आमदार व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असली तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यावर आणि नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत निवडणूक रणनीतीबाबत चर्चा झाल्यावर सोमवारी आणखी काही पक्षप्रवेशांचा निर्णय झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गरवारे क्लबमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

भाजप खासदार नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करून त्यांचे मुलगे नितेश व नीलेश यांच्या भाजपप्रवेशालाही २ ऑक्टोबरचा मुहूर्त मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा त्यास तीव्र विरोध असून नितेश राणे यांची जागा भाजपला देण्याची शिवसेनेची तयारी नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button