breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

MPSCसह कोणतीही परीक्षा पुढे ढकललेली नाही- राजेश टोपे

मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर MPSC तर्फे घेण्यात येणारी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा पुढे ढकलली जाईल अशी चर्चा होती. मात्र वेळापत्रकानुसार म्हणजेच रविवार १५ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही. शिवाय राज्यातील कोणतीही परीक्षा पुढे ढकलण्यात आली नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

सहा केंद्रांवर होणार परीक्षा

राज्यातील सहा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून ९५ हजार उमेदवार या परीक्षेला बसलेले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या शहरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विशेष म्हणजे जिथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत त्या पुण्यात जवळपास ४० हजार म्हणजेच सर्वात जास्त उमेदवार परीक्षा देणार आहेत.

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या केंद्रावर MPSC ची परीक्षा होणार की नाही याची चर्चा होती. मात्र कोणत्याही केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन सरकारने केलेलं आहे. त्यामुळे या परीक्षेचं काय होणार अशी चर्चा सुरू होती. तर, ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होत होती, मात्र तसा कोणताही निर्णय MPSC अथवा शासनाने घेतलेला नाही. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button