breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सामान्य नागरिकांना हादरा!गॅस सिलिंडरवरील सबसिडी रद्द

नवी दिल्ली – कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी केंद्र सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना हादरा बसला आहे. या गॅस सिलिंडरच्या किंमती खुल्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीच्या पातळीवर आल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अनुदानित गॅस सिलिंडरवरील सबसिडी टप्प्याटप्प्याने कमी करून ती बंद करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या सबसिडीत सरकारने कपात केली होती. त्यानंतर गेल्या ४ महिन्यांपासून ही सबसिडी बंद केली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या सबसिडीचे पैसे नागरिकांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. अनुदानित आणि विनाअनुदानित १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ५९४ इतकी झाली आहे. या दोन्ही गॅस सिलिंडरच्या दरात आता फारशी तफावत राहिलेली नाही. त्यामुळे गॅस सबसिडीची आता गरज नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे ती आता रद्द केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button