breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“रूग्णांना मदत करण्यास अपयश आलं तर, रात्र-रात्र झोप येत नाही”

अहमदनगर – पारनेरचे आमदार निलेश लंके  सध्या देशभर चर्चेत आहेत. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना लोकवर्गणीतून निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये 1100 बेडचं कोविड सेंटर उभारलं आहे. त्यांच्या या कोविड सेंटरमध्ये ते स्वतः मुक्काम करतात आणि कोरोनाग्रस्तांना मदत करतात. कोविड सेंटरमध्ये सामान्य माणसांसारखा झोपलेला त्यांचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी निलेश लंके यांचं कौैतूक केलं होतं.

रूग्णांना मदत करण्यास अपयश आलं तर, रात्र-रात्र झोप येत नाही. निस्वार्थीपणाने काम केलं, तर हजारो हात देणारे असतात. लोकांनी भरभरून या कोविड सेंटरला मदत दिली आहे. आतापर्यंत या कोविड सेंटरला तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांची झाली आहे, अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी सांगितली आहे.

रुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जातो. या कोविड सेंटरला फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, पॅरिस या देशांमधून लोकांनी आर्थिक मदत केली आहे. तर हे सेंटर उभारण्यासाठी अरुण भुजबळ यांनी आपले मंगल कार्यालय मोफत दिलं आहे, असं देखील निलेश लंके यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, स्वतःचा मुलगा इतकी काळजी घेत नाही इतकी काळजी निलेश लंके घेतात. आमदारांचं काम पाहून डोळ्यात अश्रू येतात, असं तिथे उपचार घेणाऱ्या रूग्णांनी सांगितलं आहे. निलेश लंके यांचा आदर्श इतरांनी घेतला तर, गोर गरिबांचे हाल थांबतील. लवकरच आपला देश या महामारीतून मुक्त होईल, अशी भावना देखील कोरोना रूग्णांनी प्रकट केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button