breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘पुणे ट्रॅफिकमुक्त बनवण्याचा निर्धार’; सुनील देवधर

राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जयंतीदिनी ‘समरसता सेवा पुरस्कारांचे’ वितरण

पुणे : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी पुण्यातील परीट समाजाच्या ज्येष्ठांचा तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘समरसता सेवा पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे भाजपा नेते सुनील देवधर यांनी आपल्या मनोगतात ट्रॅफिक, प्रदूषणमुक्त पुण्याचा निर्धार व्यक्त केला. पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळ बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शुक्रवारी, वानवडी स्थित महात्मा फुले सांस्कृतिक भवनात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती समारोह समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमप्रसंगी माजी खासदार प्रदीप रावत, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, युवा नेते कुणाल टिळक, अभिनेते अजिंक्य देव, ओबीसी शहर अध्यक्ष नामदेव माळवदे, सामाजिक समरसता मंचाचे नंदकुमार राऊत, संजय गाते, दिनेश होले, लहुजी वस्ताद समाधी समितीचे सुखदेव अडागळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक उपस्थित होते.

संत गाडगेबाबा वर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट बनवणारे प्रसिद्ध ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त आणि पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर परीट समाजाचे नेते नाना नाशिककर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राज्यसभेच्या नवनियुक्त खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांचा देखील विशेष अभिनंदनपर सन्मान करण्यात आला. यासमवेत १०० पेक्षा अधिक स्वच्छता करणाऱ्या हातांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

संत गाडगेबाबा यांनी समाज जागृतीचे मौलिक कार्य केले. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी बनवलेला ‘देवकी नंदन गोपाला’ हा चित्रपट पाहिला आणि गाडगेबाबा यांच्या विषयी अधिकची माहिती झाली. त्याचप्रमाणे गाडगेबाबा यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन तरूणांनी पंढरपूर वारी दरम्यान निर्मलवारी सुरु केली. याच पार्श्वभूमीवर आपणही स्वच्छता राखून, पुण्याला स्वच्छ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळ बनवूया, असा निर्धार सुनील देवधर यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा – मिशन-२०२४ : पिंपरी-चिचवडमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी पदाधिकारी मेळावा!

कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले भाजपा राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अनेक योजनांच्या माध्यमातून राष्ट्रसंत गाडगेबाबांचे स्वप्न कसे साकार करीत आहेत ते विस्ताराने सांगितले.

यावेळी बोलताना माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केले. आता आपल्याला येणाऱ्या काळात २०२७ सालापर्यंत पुण्याला स्वच्छ शहर बनवायचे आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरात सुनील देवधर सातत्याने काम करत आहेत. विविध कार्यक्रम राबवत आहेत. ते पुण्याचेच आहेत. प्रचारक म्हणून त्यांनी पुर्वोत्तर राज्यांत काम केले आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.”

“राज्यसभा खासदार म्हणून मला पक्षाने संधी दिली असून, हे पुणेकरांचेच आशीर्वाद आहेत, येणाऱ्या काळात पुण्यातील कामासाठी प्रामाणिकपणे काम करेन”, अशा भावना राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

यावेळी माजी उपमहापौर नाना नाशिककर म्हणाले की, “पुरस्कार देऊन ज्यांचा आज आपण सन्मान केला, ती सर्व मंडळी गेली अनेक वर्ष समाजाचे काम करत आहेत. गाडगेबाबांच्या विचारांचे हे कार्य असेच अविरत सुरु ठेवावे!” परीट समाजातील या स्वच्छता करणाऱ्या माता भगिनींना सन्मानित केल्याबद्दल त्यांनी सुनील देवधर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले! कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंदार खराडे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button