breaking-newsपिंपरी / चिंचवड

साने चाैक ते शिवरकर चाैक तात्काळ रस्ता रुंदीकरण करा

छावा क्रांतिवीर सेनेकडून आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेने साने चाैक ते शिवरकर चाैक हा 24 मीटर रुंदीचा रस्ता अद्याप विकसित केलेला नाही. नवनगर विकास प्राधिकरणाने हा रस्ता पालिकेकडे वर्ग केला आहे. तरीही त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असून हा रस्ता तात्काळ रुंदीकरण करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, पालिकेने हा रस्ता विकसित न केल्याने त्या रस्त्यावर अनधिकृतपणे बांधकामे, त्यावर दुकाने, टप-या प्रमाण वाढू लागले आहे. अनेकांनी नैसर्गिक नाला बंदीस्त करुन त्यात राडारोडा टाकण्याचे काम सुरु केले आहे. पावसाळ्यात नाल्याचे पाणी तुंबून लोकांच्या घरामध्ये घुसत आहे. सदरील रस्ता सध्या 10 मीटर असून तो 24 मीटर रुंदीकरण करणे गरजेचे आहे.

दरम्यान, हा रस्ता 24 मीटर रुंद न केल्यास भविष्यात कोणत्याही जिवितास होणा-या घटनेस पालिकेचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया लवकर सुरु करावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे विजय जरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button