breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

पेट्रोल 18 पैशांनी तर डिझेल 14 पैशांनी स्वस्त

पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये प्रति लिटर 18 पैसे आणि 14 पैसे अशी कपात झाली आहे. गुरुवारी मुंबईत पेट्रोलचे दर 16 पैशांनी कमी झाले होते तर डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली नव्हती. आज डिझेलचेही दर प्रति लिटर 14 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 84 रुपये 68 पैसे असेल तर डिझेलचा दर प्रति लिटर 77 रुपये 18 पैसे असणार आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

ANI

@ANI

Petrol and diesel prices in are Rs 79.18 per litre (decrease by Rs 0.19) and Rs 73.64 per litre (decrease by Rs 0.14), respectively. Petrol and diesel prices in are Rs 84.68 per litre (decrease by Rs 0.18) and Rs 77.18 per litre (decrease by Rs 0.14), respectively.

दिल्लीतही पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 14 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे दिल्लीतले दर पेट्रोल 79 रुपये 18 पैसे प्रति लिटर तर डिझेल 73 रुपये 64 पैसे लिटर असे आहेत.

पेट्रोलच्या दरांनी नव्वदी गाठली होती, तर डिझेलचे दर ८० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे दर काही प्रमाणात का होईना पण कमी होताना दिसत आहेत. दिवाळी तोंडावर आलेली असताना हा काही अंशी का होईना दिलासा मिळताना दिसतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत ज्याचाच परिणाम म्हणून गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर घटत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button