breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रिक्षा चालकानो आपल्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरा – बाबा कांबळे

– रावेत ताथवडे येथे रिक्षा चालक मालकांचा मेळावा

पिंपरी | प्रतिनिधी
रिक्षा चालकांनो आपला हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरा संघर्ष करा. एकत्र येऊन सरकारी धोरणांचा विरोध करा, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांना केला. लवकरच सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही त्यांनी दिला.

रावेत, ताथवडे येथे रिक्षा चालक मालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्ष पदी संदीप पवार होते. या वेळी संघर्ष रिक्षा स्टॅन्ड चे बाबा कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते युवराज सोनवणे, सहारुख खान, रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र समन्वय बाळासाहेब ढवळे, विजय ढगारे, धनंजय कुदळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे, सुरेश सोनवणे, तुषार लोंढे, हिरामण गवारे, राहुल बोराडे, नंदलाल निकम, अनिल शिरसाठ, संजय दौंडकर, जफर शेख आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालकांचे बँकेचे हप्ते थकले आहेत. हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपन्या गुंडा मार्फत रिक्षा जप्त करत आहेत. आर्थिक संकटांना कंटाळून महाराष्ट्रात १२ रिक्षा चालकांनी आत्महत्या केल्या आहेत. कल्याणकारी मंडळाची घोषणा झाली अजून महामंडळ स्थापन झाले नाही. मुक्त रिक्षा परवाना मुळे ग्राहक कमी रिक्षा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुक्त रिक्षा परवान्यामुळे रिक्षा वाढल्या. परंतु नवीन रिक्षा स्टँड नाही. मेट्रो, बीआरटी, पीएमपीएमएलला प्रवाशी सेवेच्या नावाखाली हजारो करोडो रुपये अनुदान दिले जात आहे. रिक्षा चालकही प्रवासी सेवा देतात, त्यांना फुकटी कवडी दिली जात नाही.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी अध्यक्ष किशोर कांबळे, खजिनदार हेमंत शिंदे, सेक्रेटरी अनिल जेऊरकर , कार्याध्यक्ष अविनाश जोगदंड, सचिव महादेव बोराडे, कांचन बाबा जोगदंड, कमलाकर सितापे, पंढरी खामकर, गोकुळ मिरगणे, खाजापिर मुल्ला , महेंद्र कांबळे, बालाजी लिंगाडे, रामदास लोखंडे, प्रदीप मंठाले यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्र संचालन अविनाश जोगदंड यांनी केले, आभार उपाध्यक्ष खलिल मकानदार यांनी मानले,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button