breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
चंद्रपूरचे प्रसिद्ध व्यावसायिक आणि काँग्रेस कार्यकर्ते मनोज अधिकारी यांची हत्या
चंद्रपूर – चंद्रपुरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि काँग्रेस कार्यकर्ते मनोज अधिकारी (३८) यांची पडोली येथील सिनर्जी वर्ल्ड या वसाहत परिसरात कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
ही घटना काल बुधवारी दुपारी दीड ते २ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मनोज अधिकारी हे परवापासूनच बंगाली कॅम्प येथील आपल्या राहत्या घरी परतले नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी दोघाजणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे