breaking-newsपिंपरी / चिंचवड

सातजणांकडून एकावर सशस्त्र हल्ला, तरुण अत्यावस्त

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर सातजणांनी खूनी हल्ला केला. कोयत्याने सपासप वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सात जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. शनिवारी (दि. 14) सायंकाळी साडेसातच्या सुमारास परंदवडी सोमाटणे रोडवरील मुंजा ओढ्याजवळ ही धक्कादायक घटना घडली.

रोहन दिनकर गराडे (वय 19, रा. धामणे, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रसाद ऊर्फ पर्शा देंभेकर (रा. उर्से), आकाश साळुंखे (रा. चौराईनगर, सोमाटणे फाटा), केतन पोकळे (रा. सोमाटणे फाटा), हर्षद भोकरे (रा. शिवणे), अनु उर्फ अनुराधा काळे (रा. तळेगाव दाभाडे) आणि अन्य दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आदित्य विलास गराडे (वय 17) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन आणि आरोपी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रोहन आणि आदित्य त्यांच्या दुचाकीवरून ब्लू डार्ट कंपनीचे पार्सल घेऊन जात होते. ते परंदवडी सोमाटणे रोडवरील मुंजा ओढ्याजवळ वसंत पापळ यांच्या प्लॉटिंगजवळ आले असता आरोपी तीन मोटारसायकलवरून त्याठिकाणी आले. आरोपी प्रसादने लोखंडी कोयत्याने रोहनच्या डोक्यात आणि हातावर वार केले. त्यानंतर केतन पोकळे याने कोयता घेतला आणि त्याने देखील रोहनवर वार केले. अन्य आरोपींनी रोहनला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. सर्वांनी मिळून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

यामध्ये रोहन गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button