breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये पत्नी आणि मुलाला बेदम मारहाण, पतीवर गुन्हा दाखल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून पत्नीला व मुलाला मारहाण करणाऱ्या पतीवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 14) चिचंवडमधील संभाजीनगर येथे घडला आहे.

याप्रकरणी रवींद्र भिकाजी पवार (वय 38) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोमल रवींद्र पवार (वय 34, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील छोट्यामोठ्या कारणांवरून रवींद्रने पत्नी कोमल यांना त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, चकमकीत शिवीगाळ करून मुलगा सार्थकला लोखंडी रॉडने मारहाण केली. भीतीपोटी कोमल आणि सार्थक दोघे पोलिसात तक्रार देण्यासाठी निघाले होते. त्यावर ‘पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जाते काय ?’ असे म्हणत रवींद्रने पत्नी कोमल यांच्या पायावर कोयत्याने मारहाण केली. त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर रविंद्रने लोखंडी कपाट फोडून कोमल आणि सार्थक यांचे कपडे जाळून टाकले.

शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास कोमल यांचे सासरे भिकाजी हरी पवार (वय 73) त्यांच्या घरी आले. त्यांनी रवींद्रला समजवण्याचा प्रयत्न केला. रवींद्रने वडिलांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button