breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

केरळ आणि महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

पुणे | भारतात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 3 लाख 87 हजार 673 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी केरळमध्ये सर्वाधिक 1 लाख 80 हजार 522 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 63 हजार 004 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालया हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 38 हजार 667 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, 35 हजार 743 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 21 लाख 56 हजार 493 एवढी झाली आहे.

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 कोटी 13 लाख 38 हजार 088 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

भारतात आजवर 4 लाख 30 हजार 732 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 478 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.45 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 49 कोटी 17 लाख 00 हजार 577 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 22 लाख 29 हजार 798 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 53.61 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button