breaking-newsक्रिडा

साक्षी चौधरीला सुवर्णपदक ; मनिषा-अनामिका जोडीला रौप्य

बुडापेस्ट (हंगेरी)- येथे सुरु असलेल्या वर्ल्ड युथ चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या महिला बॉक्‍सर्सनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. 57 किलो वजनी गटात भारताच्या साक्षी चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. साक्षीने क्रोएशियाच्या निकोलीना कॅसिकचा पराभव केला.

दुसरीकडे भारताच्या अनामिका आणि मनिषा या बॉक्‍सर्सना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. 51 किलो वजनी गटात अनामिकाला अमेरिकेच्या डेस्टिनी ग्रेशियाकडून अटीतटीच्या लढाईमध्ये हार पत्करावी लागली. मात्र 64 किलो वजनी गटात इंग्लंडच्या गेमा रिचर्डसनने मनिषावर एकतर्फी मात केली. याचसोबत भारताच्या जॉनी, अस्था पहावा, भावेश कट्टीमणी, अंकित खटाना, नेहा यादव, साक्षी गायधनी या बॉक्‍सर्सना उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

दरम्यान याच स्पर्धेत नितूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत नितूने सलग दुसऱ्या वर्षात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 48 किलो वजनी गटात नितूने थायलंडच्या निलादा मेकॉनचा पराभव केला. मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेतही नितूने सुवर्णपदक पटकावल होते तिचे हे लागोपाठ दुसरे सुवर्ण ठरले आहे. तसेच मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेत भारतीय महिलांनी 7 पदकं कमावली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button