breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा

चाकण –  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात चाकण पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार २७ वर्षीय महिलेच्या पतीचे मार्केटयार्ड येथे एक दुकान आहे. या दुकानात माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील हे बुधवारी आठच्या सुमारास गेले होते.

मात्र त्या ठिकाणी महिलेचा पती नव्हता, त्यांनी तिथं उपस्थित असलेल्या महिलेला तुझा नगरसेवक पती कुठे आहे. त्याने अनेक हत्या केल्या आहेत,त्याला व्यवस्थित राहायला सांग अशी दमबाजी आणि शिवीगाळ केली. दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर नगरसेवकाच्या पत्नीने आपल्या हाताला पकडून खेचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मोहित-पाटील यांच्यावर चाकण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजता तक्रारदार महिलेचा पती म्हणजेच स्वीकृत नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होण्यापूर्वी दोन्हीबाजूकडून काही जण जमा झाले होते. त्यामुळे काहीकाळ शहरात तणावाचे वातावरण होते. पंधरा दिवसांपूर्वी तक्रारदार महिलेच्या पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु ही तक्रार दाखल करणारी महिला माजी आमदार मोहिते पाटील यांच्या गटाची असल्याची चर्चा आहे. या घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button