breaking-newsमहाराष्ट्र

सांबराची शिंगे विक्रीचा डाव उघडकीस, सांगलीत एकास अटक

सांगली : सांबराची शिंगे विक्री करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला असून याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २ लाख रूपयांची सांबराची शिंगे हस्तगत करण्यात आली आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक तरुण मिरज शहरातील जिनासाब दर्गा परिसरात संरक्षित प्राण्याचे अवयव विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस उप अधीक्षक संदीपसिंह गिल व निरीक्षक राजू ताशीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक अभिजित सावंत आणि कर्मचारी लक्ष्मण जाधव, मुख्तार चमणशेख, विष्णु काळे, संतोष पुजारी, सचिन धोत्रे, सुशील मस्के, सुहेल मुल्ला, नागेश मासाळ, अभिजित पाटील आदींनी सापळा लावला.

या वेळी रसिक प्रवीण जकाते (वय २४ रा. मल्लेवाडी) हा तरूण संशयितरित्या जिनासाब दर्गा परिसरात घुटमळत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या पिशवीत दोन सांबराची शिंगे आढळून आली. यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. ही सांबर शिंगे विक्रीसाठी आणली असल्याची माहितीही या तरुणाने दिली. या सांबरिशगाची बाजारभावाने २ लाख रूपये किंमत आहे.

वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसार सांबर हा प्राणी संरक्षित असून त्याची शिकार करणे, त्याचे अवयव बाळगणे, आणि खरेदी-विक्री करणे गुन्हा असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ही सांबरिशगे कोठून आणली, त्यांने सांबराची शिकार केली आहे का याबाबत तरुणाकडे कसून चौकशी करण्यात येत असून पुढील तपास उप निरीक्षक सावंत हे करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button