breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोविडच्या लसीकरणासाठी नोंदणी करा

वैद्यकीय विभागाचे आरोग्य सेवा बजावणार्यांना आवाहन

पिंपरी | प्रतिनिधी

देशातील शासकीय, खाजगी व आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारने त्याबाबत माहिती संकलित करण्याच्या सुचना दिल्या आहेत्य. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय, महापालिका व खाजगी आस्थापना, आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांनाही लस देण्यात येणार आहे. त्यासाठी संबधीत व्यक्तींनी महापालिकेच्या सारथी ऍपवर नोंदणी करण्याचे आवाहन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी कोविड -१९ लस निर्मितीसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारकडून कोविड १९ लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी यांची माहिती अहवाल संकलन करण्याचे काम सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय, मनपा व खाजगी आस्थापना, आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना कोवीड-१९ प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-१९ प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय, मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वैद्यकिय विभागामार्फत सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिक, इंडियन मेडिकल असोशिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन, पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन, दंततज्ञ संघटना, पॅथोलॉजिस्ट संघटना, नर्सेस असोशिएशन, फार्मासिस्ट असोशिएशन यांना नाव नोदणी करावी. महापालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button