breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

देवेंद्र फडणवीससाहेब सगळ्यात विद्वान माणूस! सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस एका पक्षाचे गृहमंत्री नसून संपूर्ण राज्याचे गृहमंत्री आहेत

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप राऊत यांनी केला. यावर फडणवीस यांनी संजय राऊत एवढे बिनडोक आरोप करतात की काय उत्तर द्यायचं? असे म्हटले आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला.

जगभरातील अकलेचा जेवढं ठेवा आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस साहेब सगळ्यात विद्वान माणूस आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुण्यातील लोहिया नगर येथे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, माजी मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अंधारे म्हणाल्या की, संजय राऊत हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे. ते हाडाचे पत्रकार आहे. त्यामुळे ते कुठलंही विधान इतक्या सहज आणि उथळपणे करणार नाहीत. शिवसेनेचा मुख्य आधारस्तंभ म्हणून संजय राऊत यांच्याकडे बघितल जाते. यामुळेच भाजप आणि शिंदे गट त्यांना अडचणीत आणण्याचं काम करत आहे.

याआधी देखील ईडीच्या बाबतीत त्यांना अडकवून अस्थिर करण्याचं काम करत होते. आत्ता सुद्धा राऊत साहेबांच्या जिवाला धोका निर्माण करणे हा प्रयत्न असू शकतो. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की ते एका पक्षाचे गृहमंत्री नसून संपूर्ण राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी राज्याचे गृहमंत्री सारखे वागत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button