breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Irshalwadi Landslide : इर्शाळगडावर आज पुन्हा बचावकार्याला सुरूवात, आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू

Raigad Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी दरड कोसळल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. काल पहाटे पासून बचावकार्या सुरू झालं. काल दिवसभर बचावकार्य केल्यानंतरही अद्याप घटनास्थळी मोठा मातीचा ढिगारा असून अजूनही तिथे ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एनडीआरएफनं बचावकार्याला सुरूवात केली आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे. धुके, पाऊस आणि अपुऱ्या सुविधा यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात सुविधा येत आहे. कोणतीही गाडी किंवा मशीन डोंगरमथ्यावर नेता येत नसल्याने कुदळ आणि फावड्यांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू आहे. त्यामुळे मदत कार्यात उशीर होत आहे.

हेही वाचा – मणिपूरमधील ‘त्या’ घटनेवरून राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले..

इर्शाळवाडी दुर्घटनेत पशुधनाची देखील मोठ्या प्रमाणात हनी झाली आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाने एक सहाय्यक आयुक्त, दोन पशुधन विकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या पथकामार्फत ११ शेळ्या आणि ११ गायींवर उपचार करण्यात येत आहेत. तीन बैल आणि एक शेळी मृत अढळून आली आहे.

एनडीआरएफच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप घटनास्थळी २० फुटांचा दगड-मातीचा ढिगारा तिथे असून तो उपसण्याचं काम निव्वळ कुदळ-फावड्याच्या साहाय्याने केलं जात आहे. वर चढून जाणं कठीण आहेच. जेसीबी, पोकलेन वर नेणं अशक्य आहे. सातत्याने पाऊस पडतोय. आम्ही काम करतोय तिथे पुन्हा पाणी साचतंय. त्यामुळे कामाचा एकेक मिनीट आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हे बचावकार्य अजून किती वेळ चालेल हे सांगता येत नाही. कारण कुदळ-फावड्यानं ढिगारा उपसला जात आहे. एनडीआरएफची चार पथकं बचावकार्य करत आहेत. तिथे २० फुटांचा ढिगारा आला आहे. तो तिथून हटवणं फार कठीण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button