breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजारांच्या पार

सांगली – सांगली कोरोनाचा उद्रेक कायम आहे. आज जिल्ह्यात 830 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 28 हजार 521 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 9 हजार 818 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1070 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 17 हजार 633 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सांगलीसह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसेंदिवस शेकडोनं वाढणारा रुग्णसंख्या हा आता सांगलीकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button