breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात २४ तासांमध्ये २१ हजार ९०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई – मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात २१ हजार ९०७ नवे कोरोना (Corona) रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या २४ तासांमध्ये ४२५ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तर आतापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के झाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख १ हजार १८० व्यक्ती क्वारंटाईन आहेत. तर ३९ हजार ८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज २ लाख ९७ हजार ४८० अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात आज २१ हजार ९०७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ लाख ८८ हजार १५ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ४२५ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १२२ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. इतर ४८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत. असंही आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button