breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण


सांगली | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या नऊवर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. या कुटुंबातील आधीच चौघांना कोरोनाची लागण झाली होती. हे चौघे हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेते.

हे कुटुंब इस्लामपूरमधील आहे. महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. सांगलीतील या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये आणखी पाच जणांची भर पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button