breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

जून महिन्यात नवीन पुरवणी अर्थसंकल्प मांडा, काँग्रेस नेते यांची मागणी

मुंबई | आधी मांडलेले बजेट आता उपयोगी ठरणार नाही, त्यामुळे नव्याने पुरवणी बजेट मांडा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. नवीन महसूल प्रवाह, कर आकारणी, कर्ज योजना करुन सादर होणाऱ्या बजेटला लोकसभेत मंजूर होणे आवश्यक आहे, असेही चव्हाण म्हणाले. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करुन चव्हाण म्हणाले की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेवर कोसळलेल्या संकटामुळे 1 फेब्रुवारीला मांडलेला अर्थसंकल्प आता उपयोगाला येणार नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर करावा. नवीन महसूल प्रवाह, कर आकारणी, कर्ज योजना, प्राधान्यानुसार सुधारित खर्च, विकास आराखड्यात कपात करुन सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाला लोकसभेने मंजूर करणे आवश्यक आहे.’ असे चव्हाण म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button