breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

यंदाही गणेशोत्सवात कडक निर्बंध! पालिकेकडून नियमावली जाहीर, पाहा काय आहेत नियम?

  • मंडळातील मूर्ती 4 फूटांची, तर घरातील बाप्पा 2 फुटांचा!, गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरणुकीवर पूर्णपणे बंदी

पिंपरी  – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य सरकारच्या आदेशानुसार बंधने घालण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक मंडळांकरिता 4 तर घरगुती गणेशोत्सवासाठी 2 फुटांचीच मूर्ती बंधनकारक केली आहे.

गणरायाचेआगमन आणि विसर्जन मिरणुकीवर पूर्णपणे बंदी आहे. गर्दी जमविणारे कार्यक्रम घेता येणार नाहीत. सांस्कृतीक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक जनजागृती करणारे उपक्रम राबविण्याचे सांगितले आहे. याबाबतची नियमावली महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर कोरोनाचे विघ्न कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

सार्वजनिक आणि घरगुती विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्ती 4 फुटांची, तर घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.

हे आहेत नियम?

# सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका प्रशासनाची परवानगी घ्यावी
#नियमानुसार मंडप उभारावेत
# सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती 4 फुटाहून उंच नसावी.
# घरगुती गणेशाची मूर्ती ही 2 फुटांचीच असावी.
#पारंपारिक मूर्तीएवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे शक्यतो घरीच विसर्जन करावे.
# स्वच्छेने वर्गणी वसूल करावी. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
#सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे आयोजित करावीत. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजारांना प्रतिबंध घालणारे जनजागृतीपर कार्यक्रम घेणे
#वेळोवेळी बदलणा-या नियमांमधून गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही
#धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे
#सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी.
#गणपती मंडपांमध्ये निर्जुंतकीकरणासाठी तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणा-या भाविकांसाठी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे.
# गणरायाचेआगमन आणि विसर्जन मिरणुकीवर पूर्णपणे बंदी.
# विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमुर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button